Anil Kapoor : बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. वयाच्या 65 व्या वर्षात ही त्यांचा फिटनेस पाहून सर्वजण अचंबित होतात.
नुकतेच त्यांचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत आहे. या चित्रपटातील अनिल कपूर यांच्या भूमिकेचे देखील कौतुक केले जात आहे. अशात सोशल मीडियावर ‘अॅनिमल’ चित्रपटातील अनिल कपूर यांच्या संपूर्ण लुक कशा प्रकारे तयार करण्यात आला याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या विडिओमध्ये अनिल कपूर यांच्या चेहऱ्यावर मेअकप करण्यात येत आहे. अनिल कपूर यांचा दमदार लुकचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अनिल यांची मेहनत दिसून येते. अनिल कपूर यांना या भूमिकेसाठी विशेष कष्ट करावे लागले असून त्यांनी व्हिडिओमध्ये संपूर्ण चेहऱ्याचा मुखवटा कसा घातला हे पाहायला मिळतं. तब्बल २ ते तीन तास हा सम्पूर्ण लुक तयार करण्यास लागला असा कॅप्शन हा विडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान 40 वर्षांपासून विविध चित्रपटांमध्ये अनिल कपूर यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. यावेळीही अनिल यांनी ‘अॅनिमल’ मधील दुहेरी भूमिकेसाठी खास प्रोस्थेटिक्सचा वापर केला.
अनिल कपूर यांच्या वर्क फ्रंट बाबत सांगायचे झाल्यास, लवकरच फायटर’चित्रपटामध्ये ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंग उर्फ रॉकीची भूमिकेत दिसणार आहे. नुकताच अनिल कपूर यांनी फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “स्क्वाड्रन लीडर -राकेश जयसिंग, कॉल साइन- रॉकी, डेजिग्नेशन – कमांडिंग ऑफिसर, यूनिट- एयर ड्रॅगन्स’. सध्या अनिल कपूर यांचा हा जबरदस्त लुक प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडला आहे.
View this post on Instagram