Neha Pendse : अभिनेत्री नेहा पेंडसेने (Neha Pendse) मराठीसह हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. याशिवाय तिने हिंदी बिग बॉसमध्ये देखील सहभाग घेतला होता. सध्या नेहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका इव्हेंटसाठी नेहाने परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिला ट्रोल केले जात आहे.
अभिनेत्री नेहा पेंडसेने इव्हेंटसाठी लॉंग गाउन घातला होता. त्यासोबत तिने गळ्यात डायमंड नेकलेस आणि हातात त्याच रंगाची अंगठी परिधान केली होती. मात्र तिच्या या लूकमुळे ती ट्रोल झाली आहे. तिच्या या लुकवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पापाराझींना फोटो काढण्यासाठी पोझ देताना पायाकडे कट असलेल्या ठिकाणाहून ड्रेस साइडला करताना दिसते आहे. ते पाहून नेटकरी नाराज झाले आणि त्यावरुन तिला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. नेटकऱ्यांनी नेहाचा हा व्हिडिओ पाहून ‘वय वाढतंय तशी ड्रेसची लांबी कमी होते’, ‘सांभाळता येत नाही तर चादरसारखा ड्रेस का परिधान करायचा?’ अशा कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, नेहा पेंडसेने हिंदी, मराठीसह तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. हिंदीतील प्रसिद्ध ‘मे आय कम इन मॅडम’ आणि ‘भाभीजी घर पर है’ या मालिकांमध्ये नेहा झळकली होती. यानंतर, ती 2018 मध्ये ‘बिग बॉस शो’ मध्ये दिसली होती. नेहा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. ती नेहमीची आपले हॉट अँड ग्लॅमर्स फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत अनेकांचे लक्ष वेधून घेते.