Nawab Malik: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे नवाब मलिक देखील या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. मात्र नवाब मलिक शरद पवार गटात जाणार की अजित पवार गटात जाणार हे अस्पष्ट होते. अखेर त्यांच्या एका कृतीने ते निश्चित झाले आहे. अधिवेशनात नवाब मलिक यांनी सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने चर्चांना उधाण आले आहे. नवाब मलिक यांनी अखेर अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
सभागृहात नवाब मलिक यांनी सत्ताधारी नेत्यांच्या रांगेत बसत शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का दिलाय. नवाब मलिक सर्वात शेवटी सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. त्यामुळे अजित पवार गटाला (Ajit Pawar) त्यांनी पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मलिक हे सत्ताधारी बाकांवर सर्वात शेवटी बसले आहे. त्यामुळे आता मलिक अजित पवार गटात सहभागी झाल्याचे चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप नवाब मलिक यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे ते स्पष्टपणे नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
नवाब मलिक हे सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहे.तर आतापर्यंत त्यांनी आपण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटापैकी कोणत्या गटात सहभागी होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. दरम्यान, आज विधानभवनात दाखल होताच मलिक यांची माजी गृहमंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांच्यासोबत भेट झाली. एकमेकांच्या समोर आल्यावर या दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. परंतु अधिवेशनातील नवाब मलिक यांच्या भूमिकेनंतर त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे म्हंटले जात आहे.