मंचर – महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने मंचर (ता. आंबेगाव) येथील संत ज्ञानेश्वर पतसंस्थेला जिल्हास्तरीय सहकार विघ्नहर्ता पुरस्काराने ओझर (ता. जुन्नर) येथे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थित गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा आणि दोन दिवसीय प्रशिक्षण, ओझर येथे पार पडले. या कार्यक्रमाप्रसंगी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, सहकार आयुक्त व जनबंधक महाराष्ट्र राज्य अनिल कवडे, अप्पर आयुक्त व जनबंधक महाराष्ट्र राज्य (पतसंस्था) कृष्णाजी वाडेकर, प्रकाश जगताप, सचिन सरसमकर, भास्कर बांगर, महादेव वाघ आदी मान्यवरांच्या उपस्थित पुरस्काराचे वितरण झाले.
हा पुरस्कार संस्थेचे शाखाअधिकारी नीता हिंगे, सचिन गुंजाळ, शीला एरंडे, सुवर्णा पवार यांनी स्वीकारला. यावेळी संस्थेला पुरस्कार मिळाल्याबाबत सभासदांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. या संस्थेच्या मुख्य कार्यालयासह पाच शाखा असून, उत्कृष्ट्ट प्रशासकीय कामकाज, ठेव संकलन, कर्ज वाटप, कर्ज वसुली याबाबत पूर्वी पतसंस्थेला राज्य फेडरेशनच्या वतीने चार वेळा दीपस्तंभ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, तसेच संस्थेला तीनवेळा बँको पुरस्कार प्राप्त झाला आहे.