पुणे – बँड पथकातील शिस्तबद्ध कवायतीतून शालेय जीवनात सकारात्मक शिस्तीला चालना मिळते. त्यासाठी प्रत्येक शाळेत बँड पथक असले पाहिजे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित सात राज्यांच्या राष्ट्रीय उपांत्य बँड स्पर्धा बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे, गुजरात राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे सचिव महेश कुमार मेहता, योजना शिक्षण संचालक महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, शिवछत्रपती क्रीडा संकुलचे उपसंचालक सुहास पाटील, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे, कला व क्रीडा तथा सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख सचिन चव्हाण, गोव्याच्या नोडल अधिकारी साविया अलेक्षिना, निषाद हातले, मध्य प्रदेशच्या नोडल अधिकारी अर्चना अली, राज्यस्थानच्या नोडल अधिकारी जितेंद्र गोयल, दादरा नगर हवेली व दीव दमणचे नोडल अधिकारी सुनील पगार आदी मान्यवर उपस्थित होते.
ब्रास बँड (मुलींचा गट ) स्पर्धेचा निकाल –
प्रथम क्रमांक – मध्य प्रदेश
द्वितीय क्रमांक – गोवा
तृतीय क्रमांक – दादरा नगर हवेली
ब्रास बँड (मुलांचा गट ) –
प्रथम क्रमांक – महाराष्ट्र
द्वितीय क्रमांक – मध्यप्रदेश
तृतीय क्रमांक – गुजरात
पाईप बँड (मुलींचा गट ) स्पर्धेचा निकाल –
प्रथम क्रमांक – गुजरात
द्वितीय क्रमांक – मध्य प्रदेश
तृतीय क्रमांक – राजस्थान
पाईप बँड (मुलांचा गट ) –
प्रथम क्रमांक – राजस्थान
द्वितीय क्रमांक – मध्यप्रदेश
तृतीय क्रमांक – महाराष्ट्र