Urfi Javed – उर्फी जावेदसाठी ( Urfi Javed ) तिच्या फॅशनमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणे ही काही नवीन गोष्ट नाही. फॅशन सेन्सेशन बनलेली उर्फी (Urfi Javed) नेहमीच तिच्या रंगीबेरंगी आणि अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. तिच्या हटके लूक मधील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
आणि त्यामुळेच अनेकदा ती नेटकऱ्यांकडून ट्रोल देखील होत असते. मात्र, यावेळी उर्फी विरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने ( Instagram Suspended ) मोठा निर्णय घेतला आहे. कायम स्वतःच्या विचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेद हिचा इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आला आहे. खुद्द उर्फी हिने याबद्दल माहिती दिली आहे.
ज्यामुळे उर्फी हिला आता स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाहीत. या संदर्भातील एक पोस्ट स्वतः उर्फीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटवर मेटाने दिलेली माहिती दिसत आहे. कम्यूनिटी गाइडलाइन्सचं पालन न केल्याने इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड झाल्याचं यात म्हटलं आहे.
कोण आहे? उर्फी जावेद वाचा….
उर्फी जावेद हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उर्फी आता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असली तरी छोटा पडदा मात्र तिने चांगलाच गाजवला आहे.
दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीझन 2, कसौटी जिंदगी की अशा अनेक मालिकांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ या कार्यक्रमाचं पहिलं पर्वदेखील तिने गाजवलं आहे.