जालना – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. टोपे यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी दगडफेक केल्याचे समजते. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (bank election) निवडणुकीतून ही दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आज जालना जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती. या निवडणुकीची बिनविरोध प्रक्रिया पार पडली. यानंतर काही असंतुष्ट लोकांनी गाडीवर दगडफेक केल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. (Jalana news)
“दगडफेकीची घटना घडली तेव्हा गाडीचा ड्रायव्हर आतमध्ये होता. त्याच्या जीवावर बेतलं होतं. आम्ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी वरच्या मजल्यावर होतो. तर ड्राईव्हर गाडीत होता”, असं राजेश टोपे (Rajesh tope) यांनी सांगितलं.
ज्या लोकांनी कायदा हातात घेतला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. काही असंतुष्ट लोकांनी हे कृत्य केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील टोपे यांनी यावेळी केली. (Atack on rajesh tope)