Earthquake : देशाच्या अनेक भागात आज भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, पहाटे ४ वाजता हरियाणातील सोनीपत येथे भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. त्याची तीव्रता रिश्ट र स्केलवर ३.० एवढी मोजण्यात आली आहे. तर दुसऱ्या भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील दारंग येथे जमिनीपासून 22 किलोमीटर खोल होता. सकाळी 7:36 वाजता त्याची तीव्रता जाणवली आणि त्याचीही तीव्रता रिश्टर स्केलवर ३.० नोंदवण्यात आली. मात्र या भूकंपाच्या दधक्क्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आसाम आणि हरियाणामध्ये रविवारी झालेल्या भूकंपाचे धक्के इतर राज्यांमध्ये जाणवले नाहीत. त्याची तीव्रता इतकी कमी होती की त्याचा परिणाम फारसा जाणवला नाही. आसामच्या दारंग आणि हरियाणाच्या सोनीपतमध्येच भूकंपाचे धक्के जाणवले. काही काळ लोक घाबरून घराबाहेर पडले मात्र यात कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
Earthquake of Magnitude:3.0, Occurred on 26-11-2023, 07:36:47 IST, Lat: 26.49 & Long: 92.08, Depth: 22 Km ,Location: Darrang, Assam, India for more information Download the BhooKamp App https://t.co/LbfWPkksvj@Dr_Mishra1966 @ndmaindia @KirenRijiju @Indiametdept @Ravi_MoES pic.twitter.com/d4dmg1LH51
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) November 26, 2023
दरम्यान, गेल्या एक वर्षात जगभरात भूकंपाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. फक्त 3 नोव्हेंबर रोजी नेपाळमध्ये सहा पेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामध्ये 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. दिल्ली-एनसीआर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. लोकांनी घाबरून घरातून आणि कार्यालयातून बाहेर पळ काढला होता.
गेल्या वर्षभरात अनेक भूगर्भशास्त्रज्ञांनी छोटे भूकंपही मोठ्या भूकंपाचे संकेत असू शकतात, अशी भीती व्यक्त केली आहे. अलीकडच्या काळात राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि एनसीआर भागात भूकंपाचे धक्के वाढले आहेत, जे चिंतेचे कारण आहे.