Akbaruddin Owaisi : तेलंगणात विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने प्रचार करताना दिसून येत आहे. दरम्यान, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच AIMIM चे नेते अकरबरुद्दीन ओवेसी यांनी भरसभेत पोलिसांना धमकावल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पोलिसांनी वेळेत सभा बंद करण्याची सूचना केल्याने त्यांनी पोलिसांनाच धमकावल्याचे दिसत आहे. अकबरुद्दीन ओवेसी तेलंगणातील चंद्रयानगुट्टा येथून निवडणूक लढवत आहेत.
अकबरुद्दीन ओवेसी हैदराबाद येथील ललिताबाग येथे प्रचारसभा घेत होते. यावेळी संतोषनगरच्या एका पोलीस निरिक्षकाने नेत्यांना सभा वेळेत आटोपण्याची सूचना केली. यामुळे अकबरुद्दीन ओवेसी यांचा पारा चढला. त्यामुळे त्यांनी भरसभेतच पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
Addressed Grand #Election2023 Public Meeting At Near Unique School, Edi Bazar, #LalitaBagh Div Under #Chandrayangutta Constituency.. @asadowaisi #Vote4Kite 🪁 #TelanganaElections2023 pic.twitter.com/5PHBHUJRFR
— Akbaruddin Owaisi (@AkbarOwaisi_MIM) November 21, 2023
यावेळी सभेत बोलताना अकबरूद्दीन,“चाकू आणि गोळ्यांचा सामना केल्यामुळे मी कमजोर झालोय असं वाटतंय का तुम्हाला? माझ्यात अजूनही हिंमत आहे. पाच मिनिटे अजून उरली आहेत, मी आणखी पाच मिनिटे बोलणार. कोणी मायका लाल जन्माला आलेला नाही, जो मला थांबवू शकेल”, असे त्यांनी यावेळी म्हटले.
ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी लोकांना संबोधून विचारलं की, मी बरोबर बोललो ना? जर मी इशारा दिला तर तुम्हाला इथून जावं लागेल की आम्ही तुम्हाला पळवू? आम्हाला कमजोर करण्यासाठी हे लोक इथे येत असतात” असेही त्यांनी यावेळी बोलताना दिसून येत.