Ajit Pawar : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. या निमित्ताने राजकीय वर्तुळातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही इंदिरा गांधींना अभिवादन केले. तसेच त्यांच्या झंझावाती राजकीय प्रवासावर भाष्य केले. त्यांनी रविवारी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून इंदिरा गांधींना अभिवादन केले.
ट्विटरवरील पोस्टमध्ये अजित पवार म्हणाले, “भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि भारतरत्न इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. त्यांचा झंझावाती राजकीय प्रवास तरुणांना प्रेरणा देतो, बळ देतो.”
Tribute to the First Woman Prime Minister of India, Bharat Ratna Indira Gandhi ji on her birth anniversary today. Her fierce political journey continues to inspire & empower the youth.#IndiraGandhi pic.twitter.com/OejwbL0hqV
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 19, 2023
प्रफुल पटेल यांनीही इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्ताने पोस्ट केली. ते म्हणाले, “भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांचं स्मरण करतो.”
Remembering Former Prime Minister of India, Smt. Indira Gandhi Ji, on her birth anniversary.#IndiraGandhi #IronLady pic.twitter.com/8iVEeQpg1l
— Praful Patel (@praful_patel) November 19, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही पोस्ट करत इंदिरा गांधींना अभिवादन केलं. ते म्हणाले, “मी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. त्यांचं देशासाठी योगदान आणि बलिदान स्मरण करतो.”