नवी दिल्ली – BharatPe चे सह-संस्थापक आणि माजी MD Ashneer Grover चे नाव सर्वात जास्त चर्चेत आले जेव्हा लोकांनी त्यांना रियालिटी शो ‘Shark Tank India 1’ मध्ये जज म्हणून पाहिले. या शोच्या दोन सीझनमध्ये अश्नीर ग्रोव्हर दिसला नाही. यावर्षी मे महिन्यात अश्नीर ग्रोवरविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. अश्नीर त्याच्या अनेक समस्या सोशल मीडियावर पोस्ट करतो. दरम्यान, ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नीला आज दिल्ली विमानतळावर थांबवण्यात आले. खुद्द ग्रोवरने याबाबत माहिती दिली आहे.
सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
अश्नीर ग्रोवरने या पोस्टमध्ये सांगितले की, आज त्याला आणि त्याच्या पत्नीला दिल्ली विमानतळावर थांबवण्यात आले.आज तो पत्नीसह न्यूयॉर्कला निघाला होता. ते नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airpoert) पोहोचले होते. त्यानंतर दोघांना दिल्ली पोलिसांनी विमानतळावर थांबवले. दोघांना जारी केलेल्या लुकआउट सर्कुलर (LOC) च्या आधारे EOW ने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) विनंतीवरून अश्नीर ग्रोवर आणि त्याची पत्नी माधुरी जैन यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण ?
जून महिन्याच्या सुरुवातीला, EOW ने Ashneer ग्रोव्हरच्या कुटुंबाविरुद्ध FIR दाखल केला होता, ज्यामध्ये भारतपे चालवणार्या रेझिलिएंट इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडला पैशांचा गैरवापर आणि 81 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप होता. या एफआयआरमध्ये दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि स्वेतांक जैन यांचीही नावे आहेत. अश्नीर ग्रोव्हरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर या प्रकरणाशी संबंधित एक मोठी पोस्ट केली आहे. (Ashneer Grover wife)
Hello ! Hello !
Kya chal raha hai India mein ? Filhaal to Ashneer stopped at airport chal raha hai janab.
So facts:
1. I had not received any communication or summon from EOW since FIR in May till 8 AM today 17 morning (7 hours after returning from airport).
2. I was going to… pic.twitter.com/I0OHOXJd6F— Ashneer Grover (@Ashneer_Grover) November 17, 2023
अश्नीर ग्रोवरने केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेही विषय आहे. अनेकांनी त्याला अडवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी या गोष्टींचे समर्थन देखील केले आहे.