World Cup 2023 India vs Netherlands Match Live Score : विश्वचषक 2023 च्या 45व्या सामन्यात आज भारताचा सामना नेदरलँडशी होणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना हा देखील साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबरला दोन उपांत्य फेरीचे सामने होतील. भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे आणि 15 तारखेला न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी आज भारतीय संघ सराव सामना म्हणून मैदानात उतरेल. त्याचवेळी नेदरलँडचा संघ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. तो सध्या शेवटच्या स्थानावर आहे. अशा स्थितीत संघ भारताला काही आव्हान देण्याचा प्रयत्न करेल.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने कोणताही बदल न करता या सामन्यात प्रवेश केला आहे. नेदरलँड संघातही कोणताही बदल झालेला नाही.
IND vs NED Live: रोहित शर्मा बाद…
भारताला 17.4 षटकात 129 धावांवर दुसरा धक्का बसला. रोहित शर्मा 54 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 61 धावा करून बाद झाला. रोहितला बास डी लीडेने बरेसीकरवी झेलबाद केले. तत्पूर्वी, शुभमन गिल 51 धावा करून बाद झाला. 18 षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 130 धावा आहे. सध्या श्रेयस अय्यर आणि विराट कोहली क्रीजवर आहेत.
विराटला विश्वविक्रम रचण्याची सुवर्ण संधी..
भारतीय संघाने विश्वचषकातही सलग नऊ सामने जिंकलेले नाहीत. त्याचबरोबर विराट कोहलीला दिवाळीच्या दिवशी वनडेमध्ये शतक झळकावून एक मोठा विश्वविक्रम रचण्याची सुवर्ण संधी आहे. जर त्याने आज शतक केले तर तो केवळ सचिन तेंडुलकरला मागे सोडणार नाही तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतके झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरेल.
IND vs NED Live : भारताला पहिला धक्का..
नेदरलँड्सविरूध्द 11.5 षटकात 100 धावसंख्येवर भारतानं पहिली विकेट गमावली. शुभमन गिल 32 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. वन मीकरेनने गिलला निदामनुरुकरवी झेलबाद केले. गिलने आपल्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकार मारले. शुभमन गिलने 30 चेंडूत आपले 12 वे अर्धशतक पूर्ण केले.
पॉवरप्लेमध्ये भारताच्या 91 धावा…
भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आक्रमक सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 91 धावा केल्या होत्या.
दरम्यान, भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना हा देखील साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबरला दोन उपांत्य फेरीचे सामने होतील. टीम इंडिया मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंड संघाविरुद्ध (15 नोव्हेंबर) सेमीफायनल खेळणार आहे. दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी आॅस्ट्रेलिया विरूध्द दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. तर यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविला जाणार आहे.