Baramati Lok Sabha Election Result 2024 | बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील अटीतटीच्या लढतीत बारामतीच्या गडावर शरद पवार यांच्या तुतारीचा आवाज घुमली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठतेची असलेल्या लढतीत शरद पवार यांनी महायुतीला धोबीपछाड दिली. यंदाच्या या निवडणुकीत बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगला होता. अखेर समोर आलेल्या या निकालानंतर सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा विजय मिळवला आहे.
बारामतीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे असल्यातरी बारामतीची निवडणूक शरद पवार आणि अजित पवार दोघांनीही प्रतिष्ठेची बनली होती. सुनेत्रा पवार यांचा बारामतीतून पराभव झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
सुनेत्रा पवार यांची पोस्ट
“लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जनतेने दिलेला कौल मी नम्रपणे स्वीकारते. हाती आलेले निकाल अनपेक्षित असले तरीही या निकालातून आम्ही आत्मपरीक्षण करु. नव्याने पुनर्बांधणी करु. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दर्शवून मला मतदान केलं, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसंच सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते. सर्व कार्यकर्ते व जनता यांच्या सहकार्याबद्दलही धन्यवाद देते. जनसेवेचा माझा प्रवास इथेच संपत नाही. मी जनसेवेस कायमच तत्पर आहे आणि असेन. पुनश्च आभार!” असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी पोस्ट केली आहे आणि बारामतीच्या निकालावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) June 4, 2024
सुप्रिया सुळे यांना मतदारांची तीनवेळा मोठी साथ Baramati Lok Sabha Election Result 2024 |
दरम्यान, बारामती लोकसभा निवडणूक ही गेल्या दहा वर्षांत नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्यापूर्वी एकतर्फी होणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक २०१४ पासून चर्चेत आली. तेव्हा खासदार सुप्रिया सुळे यांनी महादेव जानकर यांचा ५९ हजार मतांनी पराभव केला. २०१४ नंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी तळागाळातील लोकांशी संपर्क साधत विकासकामे मार्गी लावली. गेल्या दहा वर्षांपासून खासदार सुळे यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरली. Baramati Lok Sabha Election Result 2024 |
२०१९ मध्ये भाजपाचा यशाचा आलेख उंचावला होता. त्यावेळी भाजपाकडून बारामतीमधून आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली. त्यावेळी कांचन कुल यांनी खासदार सुळे यांना कडवी लढती दिली होती. खासदार सुळे यांनी कुल यांचा दीड लाखांच्या फरकाने पराभव केला. यंदाच्या निवणुकीत त्यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला.
हेही वाचा:
निलेश लंकेंचा विजयानंतर मोठा गौप्यस्फोट,’विजयासाठी मला भाजपच्या स्टेजवरील नेत्यांनी मदत केली’