Grampanchayat Election Result 2023 – तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाने राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून पक्ष मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून राज्यातील 10 ग्रामपंचायतींवर विजय मिळविण्यात त्यांना यश आले आहे. या 10 ग्रामपंचायतींमध्ये भंडारा जिल्ह्यातील 9 आणि बीडमधील एक रेवती देवकी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
राज्यातील तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा निकाल समोर येत आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासह आता बीआरएस पक्षालाही ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, गेल्या आषाढी एकादशीला के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या बीआरएस पक्षाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रातून सुरुवात केली. एकादशीला त्यांनी तेलंगणामधून तब्बल 300 गाड्यांचा ताफा घेऊन के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात ग्रँड एंट्री केली. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात राज्यातील अनेक नेत्यांनी प्रवेश केला होता.
चंद्रशेखर राव यांनी मागील काही दिवसात महाराष्ट्रात अनेक सभा घेत शेतकऱ्यांना अश्वासने दिली आहेत. त्याशिवाय सत्ताधारी भाजपवर त्यांनी टीकाही केली. केसीआर यांनी मराठवाड्यातील नांदेड येथून महाराष्ट्रात प्रचाराला सुरूवात केली होती, नांदेड येथे घेतलेल्या सभेत त्यांनी ‘अबकी बार किसान की सरकार’, अशी घोषणा दिली होती. राज्यातील विविध स्तरावरील समाजकार्याची आवड असलेल्या अनेक तरुणांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.
इतर निकाल –
एकूण 2359 ग्रामपंचायतींपैकी 2115 ग्रामपंचायतींमध्ये महायुतीच्या ताब्यात 1277, महाविकासआघाडीच्या 497, इतरांच्या 341 ग्रामपंचायती आहे. यामध्ये भाजप – 617, शिंदे गट – 282, ठाकरे गट – 106, काॅंग्रेस -270, शरद पवार गट – 121, अजित पवार गट – 378 ग्रामपंचायतींवर वरचष्मा दिसून येत आहे.