World Cup 2023 India vs Sri Lanka Match live Score : विश्वचषक 2023 च्या 33व्या सामन्यात आज भारताचा सामना श्रीलंकेशी होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सहापैकी सहा सामने जिंकून टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे, तर श्रीलंकेने सहापैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. त्यांना चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आजच्या विजयासह भारत उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित करेल. त्याच वेळी, श्रीलंकेसाठी हा ‘करो वा मरो’चा सामना आहे. पराभवामुळे उपांत्य फेरीचा त्याचा मार्ग अत्यंत कठीण होईल. श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
IND vs SL Live Score : राहुल-श्रेयस यांच्यात 50+ धावांची भागीदारी
भारताने 38 षटकांनंतर 3 बाद 248 धावा केल्या आहेत. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आक्रमक फलंदाजी करत आहेत. आतापर्यंत दोघांमध्ये केवळ 39 चेंडूत 52 धावांची भागीदारी झाली आहे. श्रेयस 25 चेंडूत 32 धावा तर राहुल 16 चेंडूत 19 धावा करत फलंदाजी करत आहे. तत्पूर्वी, विराट कोहली 88 धावा करून बाद झाला तर शुभमन गिल 92 धावा करून बाद झाला.
विराटचेही शतक हुकले…
भारतीय संघाने 31.3 षटकात 196 धावांवर तिसरी आणि महत्वाची विकेट गमावली. विराट कोहली 94 चेंडूत 88 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार मारले. दिलशान मदुशंकाने त्याला निसांकाकडून झेलबाद केले. कोहलीचे 49 वे वनडे शतक आजही हुकले.
शुभमन गिल बाद
भारताला दुसरा धक्का 30.0 षटकात 193 धावसंख्येवर बसला. शुभमन गिल 92 चेंडूत 92 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकार मारले. दिलशान मधुशंकाने त्याला कुसल मेंडिसकरवी झेलबाद केले.
रोहित शर्मा क्लीन बोल्ड
पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर भारताला 4 धावसंख्येवर मोठा व पहिला धक्का बसला. दिलशान मदुशंका पहिले षटक टाकायला आला. पहिल्याच चेंडूवर रोहितने फाइन लेग साईडला चौकार मारला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मधुशंकाने रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले. रोहिलतला दोन चेंडूंत चार धावा करता आल्या. विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यानंतर रोहित स्वस्तात बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.