World Cup 2023 Pakistan vs South Africa Match : विश्वचषक 2023 च्या 26 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा एक विकेटने पराभव केला. केशव महाराज याने आफ्रिकन संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 21 चेंडूत त्याने नाबाद 7 धावा केल्या असल्या , तरीही त्याने कोणत्या परिस्थितीत धावा केल्या हे खूप महत्त्वाचे आहे.
केशव महाराज याला गोलंदाजीत विकेट मिळवता आली नाही, पण त्याने निर्माण केलेल्या दडपणामुळे पाकिस्तानी फलंदाजाने दुसरा फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीविरुद्ध जोखीम पत्करण्याचा प्रयत्न केला आणि विकेट गमावली. दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान 40 षटकापर्यंत असं वाटतं होतं की पाकिस्तान सहज सामना गमावेल मात्र, पुढच्या काही चेंडूंवर सामना फिरला आणि 42 व्या षटकात 91 धावा काढून एडन मार्कराम बाद झाला. तो बाद होताच पाकिस्तानने दबाव आणण्यास सुरुवात केली.
दक्षिण आफ्रिकेला 58 चेंडूत 21 धावा हव्या होत्या आणि तीन विकेट शिल्लक होत्या. गेराल्ड कोएत्झीही 10 धावा करून माघारी परतला. त्यानंतर संपूर्ण जबाबदारी केशव महाराज आणि लुंगी एनगिडी यांच्यावर आली. एनगीडीला हरिस रौफने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर तबरेज शम्सी मैदानात आला.महाराज शम्सी याच्यापेक्षा सिनियर खेळाडू होता आणि त्याने यापूर्वीही फलंदाजीने अनेक सामने जिंकून दिले होते. अशा स्थितीत त्याच्यावर विजय मिळवुन देण्याचे दडपण होते. या दडपणाखाली महाराज याने स्वत:ला कमकुवत होऊ दिले नाही आणि चौकार मारून दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
केशव महाराज याने सामन्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्याने लिहिले, ‘मी देवावर विश्वास ठेवतो. माझ्या संघाने किती शानदार क्रिकेट खेळले आणि त्याचा परिणाम म्हणजे संघ विजयी झाला. शम्सी आणि मार्करामची कामगिरी पाहून खूप छान वाटले. जय श्री हनुमान.’
In God Trust 🙏🏻 🕉 what a special result by the boys, awesome to see the performances from #Shamsi & #AidenMarkram
Jai shree Hanuman 🙏🏻🕉 pic.twitter.com/ikm1ucjH11
— Keshav Maharaj (@imKeshavMaharaj) October 28, 2023
केशव महाराज याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर महाराज याच्या बॅटवर लिहिलेल्या ‘ओम’चेही सर्वत्र खूप कौतुक होत आहे.तसेच त्याच्या बॅटचा फोटोही सर्वत्र व्हायरल होत आहे.
भारतीय वंशाचा खेळाडू केशव हा हनुमानाचा भक्त…
दरम्यान, केशव महाराज हा दक्षिण आफ्रिका संघातील भारतीय वंशाचा खेळाडू मूळचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील आहे. त्याचा जन्म 7 फेब्रुवारी 1990 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. या आफ्रिकन खेळाडूचे भारताशी खास नाते आहे. केशव महाराजाचे पूर्वज 1874 मध्ये उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथून दक्षिण आफ्रिकेत मजूर म्हणून गेले होते. पुढे त्यांचे कुटुंब तिथेच स्थायिक झाले.
Sanatan hi Satya hai 🚩
Jai Shree Ram 🚩 pic.twitter.com/jrkyqArSpy— Keshav Maharaj (@imKeshavMaharaj) October 27, 2023
केशव महाराजने दक्षिण आफ्रिकेत राहूनही आपल्या हिंदू प्रथा सोडलेल्या नाहीत. तो पूर्णपणे हिंदू धर्माचे पालन करतो. तो हिंदू देवदेवतांची पूजाही करतो. त्यामुळेच त्याच्या बॅटवर ओम लिहिलेले आहे. त्याच्या बॅटवर ओमचे स्टिकर अनेकदा दिसून येते. कालच्या सामन्यात ही बॅट दिसली. इतकंच नाही तर जेव्हा जेव्हा त्याला भारतात येण्याची संधी मिळते तेव्हा तो येथील मंदिरात जातो आणि दर्शन घेतो. केशव हा हनुमानाचा सच्चा भक्त असल्याचे म्हटले जाते. आणि हे त्याच्या कालच्या इंस्टाग्राम पोस्टवरून सिध्द झाले आहे.
केशव महाराज महाराज याच्या बॅटवर लिहिलेल्या ‘ओम’चेही सर्वत्र खूप कौतुक होत आहे. तसेच त्याच्या बॅटचे फोटोही सर्वत्र व्हायरल होत आहे.
Out of the entire 11 players of South Africa, the Pakistanis had to lose in the end only to #KeshavMaharaj. Who proudly writes ॐ on his bat.
Keshav Maharaj ki jai. 😅#PAKvSA #SAvsPAK #BabarAzam pic.twitter.com/2KZk5wiOuv— बिहार | Bihar ● (@Biharyouth1) October 27, 2023
Keshav Maharaj beat Pakistan with OM on his bat
Keshav Maharaj beat Pakistan with OM on his bat 🕉️ . pic.twitter.com/YaxOzXEkuP
— MAHIYANK™ (@Mahiyank_78) October 27, 2023
So #keshavmaharaj’s bat has an Ohm ॐ tattoo on it…
So #keshavmaharaj's bat has an Ohm ॐ tattoo on it…
No-wonder Pakistanis couldn't out him…. 🔥🚩 pic.twitter.com/oBNIvmOb0d
— Mr Sinha (@MrSinha_) October 27, 2023
काय घडलं मॅचमध्ये?
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघ 46.4 षटकांत 270 धावांत सर्वबाद झाला. सौद शकीलने 52, कर्णधार बाबर आझमने 50 आणि शादाब खानने 43 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेझ शम्सीने चार आणि मार्को जॅनसेनने तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 47.2 षटकांत नऊ गडी गमावून लक्ष्य गाठले. मार्करामने सर्वाधिक 91 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने तीन बळी घेतले. तर हरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर आणि उसामा मीर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.