World Cup 2023 India vs Bangladesh Match Live Score :- आज एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. तर बांगलादेश संघाने तीनपैकी एक जिंकला आहे आणि दोन गमावले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे.
179 धावांवर बांगलादेशचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. शार्दुल ठाकूरने तौहीद हृदयॉयला बाद करून भारताला पाचवे यश मिळवून दिले. हृदयाने 35 चेंडूत 16 धावा केल्या. शुभमन गिलने त्याचा झेल घेतला. आता महमुदुल्लाह रियाद मुशफिकुर रहीमसोबत क्रीजवर आहे. 40 षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या 5 बाद 189 इतकी आहे.
.@imShard with his first wicket of the match! 👏 👏
Bangladesh lose their FIFTH wicket as Towhid Hridoy departs.
Follow the match ▶️ https://t.co/GpxgVtP2fb#CWC23 | #TeamIndia | #INDvBAN | #MeninBlue pic.twitter.com/1UDd004slh
— BCCI (@BCCI) October 19, 2023
बांगलादेशला 28व्या षटकात 137 धावांवर चौथा धक्का बसला. मैदानावर स्थिरावलेल्या लिटन दासला रवींद्र जडेजाने शुभमन गिलकडे झेलबाद केले. लिटनने 82 चेंडूत 66 धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत सात चौकार मारले.
Najmul Hossain Shanto ✅
Liton Das ✅@imjadeja continues his solid run of form & how 🙌 🙌Bangladesh 4 down for 140 after 29 overs.
Follow the match ▶️ https://t.co/GpxgVtP2fb#CWC23 | #TeamIndia | #INDvBAN | #MeninBlue pic.twitter.com/dpnRp39SGu
— BCCI (@BCCI) October 19, 2023
बांगलादेशला 25व्या षटकात 129 धावांवर तिसरा धक्का बसला. मोहम्मद सिराजने मेहदी हसन मिराजला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद केले. मिराजला केवळ 3 धावा काढता आल्या.
Bangladesh 3⃣ down! @mdsirajofficial picks his first wicket of the match, courtesy a brilliant catch from @klrahul 👌 👌
Follow the match ▶️ https://t.co/GpxgVtP2fb#CWC23 | #TeamIndia | #INDvBAN | #MeninBlue pic.twitter.com/YlVjnmG8V4
— BCCI (@BCCI) October 19, 2023
बांगलादेशला 20 व्या षटकात 110 धावांवर दुसरा धक्का बसला. रवींद्र जडेजाने कर्णधार नजमुल हुसेन शांतोला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला 17 चेंडूत आठ धावा करता आल्या. बांगलादेशला पहिला धक्का 15व्या षटकात 93 धावांवर बसला. कुलदीप यादवने तंजीद हसनला एलबीडब्ल्यू आऊट केले. तंजीद हसन 43 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 51 धावा करून बाद झाला.
दरम्यान,एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संघ 4 वेळा आमनेसामने आले आहेत, यामध्येही टीम इंडियाचे वर्चस्व राहिलेले आहे. भारताने 3 सामने जिंकले आहेत तर बांगलादेश संघाला केवळ एका सामन्यात भारताचा पराभव करण्यात यश आले आहे.