आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मतदारसंघासाठी मिळाला निधी सातारा, दि. 7 (प्रतिनिधी) -सातारा- जावळी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती डांबरी रस्त्याने जोडणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा आणि जावळी तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी सातत्याने भरीव निधी उपलब्ध झाला आहे. आताही सातारा आणि जावळी तालुक्यातील आणखी 10 रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक दोनमधून तब्बल 16 कोटी 62 लाख 16 हजार रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
सातारा तालुक्यातील सहा रस्त्यांसाठी 10 कोटी नऊ लाख सात हजार रुपये मंजूर झाले आहेत. टी.आर. 02 ते गवंडी या रस्त्यासाठी दोन कोटी 46 लाख 26 हजार, वेचले ते शिवाजीनगर रस्त्यासाठी एक कोटी 94 लाख 10 हजार, परळी ते चिकणेवाडी रस्त्यासाठी एक कोटी 46 लाख 61 हजार, टी.आर. 08 ते जळकेवाडी रस्त्यासाठी एक कोटी 76 लाख 62 हजार, आसनगाव ते राकुसलेवाडीदरम्यान एक कोटी चार लाख 48 हजार, टी.आर. 02 ते दरे बुद्रूक रस्त्यासाठी एक कोटी 41 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
जावळी तालुक्यातील महिगाव ते गणपती मळा रस्त्यासाठी एक कोटी 61 लाख 80 हजार, टी.आर. 02 ते जावळेवाडी रस्त्यासाठी एक कोटी 40 लाख 71 हजार, एम.डी.आर. 139 ते बिरामणेवाडीसाठी एक कोटी 59 लाख 15 हजार आणि सांगवी ते कुडाळ या रस्त्यासाठी एक कोटी 91 लाख 43 हजार रुपये निधी उपलब्ध झाला आहे. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून मंजूर कामे वेळेत सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.