सातारा – सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून आंचल दलाल (डुडी) यांची नियुक्ती झाली असुन यापूर्वी त्यांनी साताऱ्यातच सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली आहे.
दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांची पिंपरी-चिंचवड येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. आंचल दलाल यांची वर्षापुर्वीच साताऱ्यातून सांगली येथे बदली झाली होती. साताऱ्यात असताना निर्भया पथकांसाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. याशिवाय एटीएममधून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान राहिले होते.