Asian Games 2023 ( Women’s Javelin Throw) : भारतीय महिला भालाफेकपटू अन्नू राणीने चीनमधील हांगझोऊ येथे ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून तिनं इतिहास रचला. अन्नूने मंगळवारी (३ ऑक्टोबर) भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. चौथ्या प्रयत्नात तिने मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली आणि 62.92 मीटर भालाफेक करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिने 72 वर्षाच्या इतिहासात भारतीय महिला भालाफेक पटूला जे मिळवता आलं नाही यश ते तिने मिळवून स्वत:सिद्ध केले. 10 व्या दिवसातील हे भारताचे दुसरे सुवर्णपदक ठरले.
Make way for Girl Boss, @Annu_Javelin
The #TOPSchemeAthlete absolutely threw her way into our hearts with her #Golden🥇Throw.
Congratulations on giving a majestic throw of 62.92 m💪🏻
Keep rocking Champ! #AsianGames2022#Cheer4India#HallaBol#JeetegaBharat#BharatAtAG22 pic.twitter.com/6iw1mFkv36
— SAI Media (@Media_SAI) October 3, 2023
‘जेव्हलिन क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अन्नू राणीच्या संघर्षाची कहाणी ही एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही. गावातल्या पायवाटेवर खेळणारी आणि ऊस अन् बांबूचा वापर करून भाले बनवून सराव करणारी अन्नू एके दिवशी ऑलिम्पिक, राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करेल, असे क्वचितच कोणाला वाटले असेल. आपल्या संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर तिनं हे यश मिळवले आहे.
वडिलांच्या नकळत गुपचूप सराव केला…
अन्नू राणी तीन बहिणी आणि दोन भावांमध्ये सर्वात लहान आहे. त्याचा मोठा भाऊ उपेंद्र कुमार हा देखील 5,000 मीटर धावणारा खेळाडू होता आणि त्याने विद्यापीठ स्तरावरील स्पर्धांमध्येही भाग घेतला होता. तिच्या मोठ्या भावासोबत अन्नू राणीनेही खेळात रस दाखवला आणि ती पहाटे चार वाजता उठून गावातील रस्त्यांवर धावायला जायची. अनेक वेळा वडिलांनी अन्नूच्या खेळात रस दाखवला नाही पण तिनं जिद्द सोडली नाही अन् गुपचूप सराव करत राहिली.
अन्नूची खेळातील आवड पाहता भाऊ उपेंद्र कुमार यांनी तिला गुरुकुल प्रभात आश्रमाचा रस्ता दाखवला. घरापासून 20 किलोमीटर अंतरावर असल्याने अन्नू आठवड्यातून तीन दिवस गुरुकुल प्रभात आश्रमाच्या मैदानावर भालाफेकचा सराव करत असे. अन्नूच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती दोन खेळाडूंचा खर्च उचलेल अशी नव्हती. हे पाहून भाऊ उपेंद्रने माघार घेतली आणि बहिणीला पुढे नेण्यास सुरुवात केली अन् तिची या खेळातील आवड आणि प्रगती पाहून कुटुंबीयांनी पूर्ण ताकदीने अनूचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला.
दान केलेल्या पैशातून खरेदी केले बूट…
उपेंद्र सांगतो की, अन्नूकडे बूट नव्हते, त्याने देणगीतून जमा केलेल्या पैशातून तिच्यासाठी बूट खरेदी केले. अन्नूने तिचा सराव सुरू ठेवला आणि भालाफेकमध्ये चमकदार कामगिरी केली. तिचेच विक्रम मोडून ती राष्ट्रीय विजेती ठरली. यानंतर अन्नूने कधीही मागे वळून पाहिले नाही.