मुंबई – अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या ‘आशिका 2’ (Aashiqui 2) या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. या चित्रपटातील त्यांच्या जोडीला मोठा प्रतिसाद मिळाला. ‘आशिका 2’ च्या माध्यामातून ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता ही जोडी अनेक वर्षांनी एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर बुधवारी मुंबईतील टी-सीरिजच्या कार्यालयात आयोजित गणेश चतुर्थी उत्सवात भेटले. भेट झाल्यावर दोघांनीही हसत एकमेकांना मिठी मारली आणि एकमेकांची विचारपूस केली. दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसल्याने चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. यावेळी नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा या जोडीला एकत्र चित्रपटात पाहण्यास उत्सुक असल्याचे म्हंटले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर ‘आशिकी 2’ नंतर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र यावर श्रद्धाने एका मुलाखतीत आम्ही केवळ चांगले मित्र असल्याचे म्हंटले होते. सध्या आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या डेटींगच्या चर्चा रंगल्या आहेत. आदित्य-अनन्याचे व्हेकेशन फोटो व्हायरल झाल्यापासून त्यांच्या प्रेमसंबंधांवर चर्चा करत आहेत. श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, श्रद्धा शेवटची रणबीर कपूरसोबत ‘तू झुठी मैं मकर’मध्ये दिसली होती. तर आदित्य ‘ये जवानी है दिवानी’, ‘गुजारिश’, ‘अॅक्शन रिप्ले’ यासारख्या काही चित्रपटांमध्ये काम केले आहे.