मुंबई – शाहरुखचा जवान रिलीज होताच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने 100 कोटींच्या पुढे कमाई केली आहे. शाहरुख खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि एक सूचक संदेश देखील दिला आहे. ज्यामुळे चाहत्यांनी आता जवान 2 येणार असल्याच्या चर्चा सुरु केल्या आहेत.
शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. कारण आहे चित्रपटाचे प्रचंड यश. चित्रपटगृहे हाऊसफुल्ल आहेत. शाहरुखच्या चाहत्यांना तर ‘जवान’चे वेड लागले आहेत. काही लोक तर ‘जवान’ अवतारात चित्रपट पाहण्यासाठी जात आहेत. ‘जवान’ रिलीज होऊन अवघे काही दिवस झाले आहेत की चाहत्यांमध्ये ‘जवान 2’ची चर्चा सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
‘जवान’ चित्रपट पाहिल्यानंतर आता ‘जवान 2’ला चाहत्यांकडून मोठी मागणी होताना दिसत आहे. दरम्यान, शाहरुख खानने अशी एक पोस्ट केली आहे, ज्यानंतर चाहते अस समजत आहेत की त्याने ‘जवान 2’ बद्दल हिंट दिली आहे.
शाहरुख खानने जवान 2 बाबत दिली हिंट ?
एका ट्विटर यूजरने शाहरुख खानला टॅग करत ट्विट केले होते. युजर म्हणाला, “सर तुम्ही कालीशी का डील करत नाही. मी विजय सेतुपतीचा खूप मोठा चाहता आहे.” चाहत्याला उत्तर देताना शाहरुखने असे काही सांगितले ज्याला फॅन्स ‘जवान 2’ शी जोडत आहेत. चाहत्याने केलेल्या ट्विटवर शाहरुखने म्हटले की, “मीही काली सरांचा खूप मोठा चाहता आहे. पण मी कालीचा काळा पैसा घेतला, आता बघा मी स्विस बँकेतून इतरांचेही काळे पैसे आणतोय. फक्त व्हिसाची वाट पाहतोय. हाहा.”
I am a big fan of Vijay sir too… par Kaali ka kaala dhan toh le liya ab dekho doosron ke bhi Swiss banks se lekar aata hoon… Buss visa ka hi wait kar raha hoon. Ha ha!!! https://t.co/bgrzn77VVD
— Shah Rukh Khan (@iamsrk) September 9, 2023
शाहरुखच्या या ट्विटने चाहते खूश आहेत
शाहरुखचे हे ट्विट पाहून चाहते खूप उत्सुक आहेत. किंग खानने ‘जवान 2’ बाबत हिंट दिल्याचे त्यांना वाटते. एका यूजरने लिहिले की, ‘जवान 2 फ्लोअरवर आहे.’ एकजण म्हणाला, ‘अटली भाई प्लीज जवान 2 या वर्षीच रिलीज करा. आणखी एका यूजरने ट्विट केले की, ‘ग्रेट, म्हणजे जवान 2 लवकरच येत आहे.’