मुंबई – सध्या संपूर्ण राज्यभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘सबसे कातील गौतमी पाटील…’ दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते. संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे.
आज दहीहंडीचा सण असून ठिकठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. नेक ठिकाणी भव्य दहीहंडी उत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे. गोविंदा पथक रचत असलेले थरावर थर नागरिकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू थर आहेत. अशातच कलाकारांनाही या दहीहंडी उत्सवाला आमंत्रित करण्यात येत आहे.
मुंबई परिसरातील मागठाण्यातील तारामती चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीनेही दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला गौतमी पाटील हिने हजेरी लावली आहे. गौतमी हजेरी लावणार म्हटल्यावर तिच्या चाहत्यांनी देखील तुफान गर्दी केली आहे. यावेळी गौतमीने ‘सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम…’ आणि ‘पाव्हणं जेवला का?’ या गाण्यावर तिने परफॉर्मन्स सादर केला.
यावेळी प्रेक्षकांनीही तिच्यासोबत या गाण्यावर ठेवा धरला. गौतमी पाटीलचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचा डान्सही अनेकांना आवडतो. गौतमी पाटीलची एक झलक दिसावी म्हणून चाहते प्रयत्न करत असतात.