मुंबई – कमाल रशीद खान उर्फ केआरके अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने मीडियामध्ये चर्चेत असतो. स्वत:ला समालोचक म्हणवणारा केआरके बॉलीवूड स्टार्सवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडत नाही. नुकतंच त्याने आपल्या ट्विटद्वारे साऊथ सुपरस्टार रजनीकांतची खिल्ली उडवली, त्यानंतर अभिनेत्याच्या चाहत्यांनी अक्षरशः शिव्या देत ट्रोल केलं.
साऊथ इंडस्ट्रीमध्ये रजनीकांत यांचे प्रचंड फॅनफॉलोविंग आहे. त्यांच्या अनेक सिनेमांची सुरुवात चाहते त्यांच्या कटआऊटला चित्रपटगृहाबाहेर अभिषेक करून करत असतात. यावरूनच थलाईवावर संपूर्ण साऊथ इंडस्ट्री किती प्रेम करते याचा प्रत्येय येतो. अशात केआरकेने रजनीकांत यांच्याबाबत केलेली टिपण्णी चाहत्यांना रुचलेली दिसत नाही.
केआरकेने ट्विटरवर रजनीकांतचा एक फोटो शेअर केला. यावेळी अभिनेत्याने लिहिले,”रजनीकांतने दाखवून दिलं की सुपरस्टार होण्यासाठी तुम्हाला उंची, व्यक्तिमत्व, शिक्षण इत्यादींची गरज नसते.तुमच्याकडे फक्त लक आणि ऍटिट्यूड असलं पाहिजे”. रजनीकांत यांना टोमणा मारून त्यांच्या शिक्षण आणि दिसण्याबाबत भाष्य करणं केआरकेला चांगलंच महागात पडलं आहे.
केआरकेच्या या पोस्टमुळे चाहते चांगलेच भडकले असून अनेकांनी त्याला कमेंटमध्ये शिव्या द्यायला देखील कमी केलेले नाही. रजनीकांत यांच्यावर केलेल्या या टिपण्णीमुळे चाहते केआरकेवर अक्षरशः तुटून पडले. केआरकेच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्याला ट्रोल केलं. ‘मग तुला सुपस्टार होता का आलं नाही ? तुला काम करण्यासाठी कोणी रोखलं होत ? असे अनेक प्रश्न रजनीकांत समर्थकांनी केआरकेच्या या पोस्टखाली विचारले आहेत.