मुंबई – बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अनेक फोटो आणि व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच त्यांनी त्यांचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो पाहून चाहतेही आनंदी झाले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलल्या व्हिडिओमध्ये त्यांनी उंच बूट, डेनिम जीन्स, शर्ट आणि लेदर जॅकेट परिधान केल्याचे दिसते. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘अच्छे दिन थे यार’ असे कॅप्शन दिले आहे. त्यांचा हा जुना लुक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. यावर नेटकऱ्यांनी ‘अप्रतिम लुक’, ‘सर, तुम्ही खुपच हँडसम दिसत आहात’ ‘ सर, तुम्ही खरोखरच प्रेरणास्थान आहात’, अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. त्यांचा हा लुक नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी ‘सेक्शन ८४’ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. याशिवाय, बिग बींचा दीपिका पदुकोणसोबतचा ‘द इंटर्न’ या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेकही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांचा ‘उंचाई’ हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट चार मित्रांच्या मैत्रीवर आधारित होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. उंचाई चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनुपम खेर देखील मुख्य भूमिकेत होते.