नवी दिल्ली – भारताची दोनवेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू व स्टार खेळाडू लक्ष्य सेन यांनी येथे सुरू असलेल्या अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
सिंधूने कोरियाच्या सुंग शाओ युनवर 21-14, 21-12 अशी मात केली. लक्ष्यने चेक प्रजासत्ताकच्या जॅन लोदा याच्यावर 21-8, 23-21 असा केवळ 39 मिनिटांत विजय मिळवला.
लक्ष्यचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना भारताच्याच एस. शंकर मुथ्थुस्वामीशी होणार आहे. मुथ्थुस्वामीने उपउपांत्यपूर्व फेरीत इस्रायलच्या मिशा जीबेरमनचा 21-18, 21-23, 21-13 असा पराभव केला.