पुणे- कोंढवा परिसरातील एका मंदिरातून पितळेची मोठी घंटा चोरीला गेली होती. हा भाविकांच्या श्रद्धेचा विषय असल्याने मंदिर प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली . या तक्रारीची गंभीर दखल घेत कोंढवा पोलिसांनी तांत्रीक तपास आणि खबऱ्यांच्या आधारे घंटा चोरणाऱ्याला अटक केले. त्याच्या ताब्यातून चोरलेली घंटा पुन्हा हस्तगत करण्यात आली आहे.
इलियाज शेख (25, रा. वडारवाडी, गोलंदाज चौक, शिवाजीनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.कोंढवा परिसरातून भैरवनाथ मंदिरामधील घंटा चोरीला गेली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक संजय मोगले आणि संदिप भोसले यांनी तपासाच्या सूचना दिल्या. त्यानूसार सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, सुहास मोरे, राहुल थोरात, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, राहुल रासगे, विकास मरगळे, राहुल वझारी यांच्यापथकाने घटनास्थळाच्या आजुबाजुस असणा-या सीसीटिव्हिच्या माध्यमातुन आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली.
त्यांना एक व्यक्ती रिक्षातून घंटा चोरी करुन नेत असल्याचे दिसले. रिक्षा मालकाला शोधून काढले असता, त्याने त्याची रिक्षा ही सोहेल इलियाज शेख यास शिफ्टने चालविण्यासाठी दिली असल्याचे सांगितले. त्याला लुल्लानगर भागातून ताब्यात घेण्यात आले. त्याने चोरीची कबुली देऊन रिक्षाच्या मागील बाजूस लपवलेली घंटा पोलिसांच्या ताब्यात दिली. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार रणजित शिंदे करित आहे.