मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री दिव्या दत्ताने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अगदी छोटी भूमिका देखील तिने उत्तमरित्या निभावून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. 2012 साली आलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात देखील फरहान अख्तरच्या मोठ्या बहिणीची म्हणजे इसरी कौरची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिचे कौतुकही करण्यात आले होते. मात्र या चित्रपटात काम करण्यासाठी दिव्याने नकार दिला होता. याबाबत तिने स्वत: एका मुलाखतीत संगितले आहे
दिव्याला या चित्रपटात फरहान अख्तरच्या बहिणीची भूमिका करायची नव्हती. एका मुलाखतीत तिने सांगितले की, ”ती भूमिका मला आधी करायची नव्हती कारण त्या दरम्यान फरहान माझा क्रश होता. त्यामुळे मी या सिनेमाला नकार दिला होता आणि मी त्याची बहीण बनणार नाही, असे सांगितले. पण दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा मला म्हणाले, ‘तू एक कलाकार आहे, त्या अनुषंगाने विचार कर”. त्यानंतर दिव्या चित्रपट करण्यासाठी तयार झाली.
राकेशने दिव्याला तिचा विचार बदलण्यास सांगितले, कारण ती या भूमिकेसाठी त्याची पहिली आणि शेवटची निवड होती. दिव्याने हे देखील उघड केले की जेव्हा ती पहिल्यांदा भाग मिल्खा भागच्या शूटिंगसाठी सेटवर पोहोचली तेव्हा तिने फरहान अख्तरला ओळखले नाही. तो हुबेहूब मिल्खा सिंगसारखा दिसत आणि वागत होता. तेव्हा मी म्हणाले होते ‘हा फरहान नाही, हा तर मिल्खा आहे.’