मुंबई – हेमा मालिनी यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओलने ‘धूम’ या चित्रपटाने खूप चर्चेत आणले. यशराज फिल्म्सच्या धूमच्या टायटल ट्रॅकमध्ये ईशाने बिकिनी सीन्स दिले होते. आता ईशाने तिच्या बिकिनी सीनबद्दल बोलताना सांगितले की, यशराज फिल्म्सचे निर्माते-दिग्दर्शक आदित्य चोप्राने जेव्हा तिला 2004 मध्ये आलेल्या धूम या अॅक्शन चित्रपटाविषयी सांगितले की, तिला या चित्रपटात एक बिकिनी सीन करावा लागेल, तेव्हा. ईशा देओलने एक दिवसाचा वेळ मागितला. ईशाने सांगितले की, मी पहिल आई हेमा मालिनी यांची परवानगी घेणार नंतर निर्णय कळणार ..’
बिकिनी सीन करण्यापूर्वी ईशा देओल खूपच घाबरली होती. याबाबत ईशाने आई हेमा मालिनीशी चर्चा केली. पण हेमा मालिनीची प्रतिक्रिया ईशाच्या विचारापेक्षा खूपच वेगळी होती. ईशाने सांगितले की, माझ्या आईने याबाबत होकार देत, सीन चांगले शूट केले आहे याची खात्री करण्यास सांगितले.
ईशा देओल म्हणाली की, मी यापूर्वी बिकिनी घातली नव्हती असे नाही. सुट्टीत किंवा पोहताना तुम्ही स्विमसूट किंवा बिकिनी घालताच ? त्यावेळी हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया अशी होती की, ‘हो बिकनी घाल, आता त्यात काय आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर जाता किंवा कुठेतरी सुट्टीवर जाता तेव्हा प्रत्येकजण ते बिकनी घालतोच’
ईशा देओलने धूम चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. चित्रपटासाठी खास प्रशिक्षण घेतले. आदित्य चोप्राने ईशाला चित्रपटाचे शुटिंग व्यवस्थित करण्यासाठी ६ महिन्यांचा वेळ दिला होता. आदित्य चोप्राला या चित्रपटात ईशा देओलला एका खास पद्धतीने सादर करायचे होते.