नवी दिल्ली – दिल्लीतील रोहिणी कोर्ट गोळीबारातील आरोपी गँगस्टर टिल्लू ताजपुरिया याच्यावर तिहार तुरुंगात प्रतिस्पर्धी टोळी सदस्य योगेश टुंडा आणि इतरांनी हल्ला करून हत्या केली होती. या हत्येनंतर जेल प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता या हत्येचा खलबजनक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये अनेकजण टिल्लूला अक्षरशः भोसकून मारताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
२ मे रोजी तिहार जेलमध्ये हा सर्व खळबळजनक प्रकार घडला होता. या हत्येचा व्हिडीओ आता सोशल मिडीआयवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुरुवातीला दोघे तिघे जण टिल्लूला धारधार शस्त्रांनी भोसकताना दिसत आहेत. यावेळी टिल्लूच्या शरीरावरील प्रत्येक भागावर वार होताना दिसत आहेत. हत्येचा हा व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
काय झालं होत नेमकं त्या दिवशी
तिहार तुरुंग क्रमांक आठ-नऊमध्ये बंद असलेला कुख्यात गुंड सुनील उर्फ टिल्लू ताजपुरिया याची मंगळवारी (२ मे) हत्या करण्यात आली. छोट्या हत्याराच्या सहाय्याने टिल्लूवर वार करण्यात आले होते. जखमी अवस्थेत त्याला डीडीयू रुग्णालयात दाखल केले असता तेथेच त्याचा मृत्यू झाला.
CCTV footage of Tallu Tajpuriya murder. He had been stabbed several times in the Tihar jail which led to his death.
Warning ⚠️:- Disturbing visuals pic.twitter.com/UxMbpIsaP5
— Akashdeep Thind (@thind_akashdeep) May 4, 2023
गोगी टोळीशी संबंधित असलेल्या योगेश टुंडावर टिल्लू ताजपुरिया यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. रोहिणी न्यायालयाच्या आवारात यापूर्वी गोगीची हत्या झाली होती. तेव्हा टिल्लू यांच्यावर हा आरोप करण्यात आला होता. टिल्लू आणि गोगी टोळी दिल्लीच्या बाहेरील भागात सक्रिय होती. भांडणातून दोन्ही टोळ्यांच्या म्होरक्याचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तिहारमध्ये एका महिन्यात टोळीयुद्धाची ही दुसरी घटना आहे. याआधी राजकुमार तेवतिया यांची हत्या झाली होती.