नवी दिल्ली – इंटरनेटवर पसरत असलेल्या द्वेष, वादविवाद, आरोप-प्रत्यारोपांच्या वातावरणात, व्हायरल झालेल्या फोटो सोशल मीडियावर सकारात्मकता आणत आहे. हा फोटो पाहता, कडक उन्हात सायकल रिक्षाचालकचे एक प्रवासी महिलेने छत्रीने डोके झाकले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. महिलेची ही माणुसकी पाहून सोशल मीडिया यूजर्स महिलेचे कौतुक करताना थकत नाहीये. युजर्स हा फोटो कुठला असून? रिक्षात बसलेली ती महिला कोण आहे, याचा शोध लोक घेत आहेत.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक महिला आपल्या रिक्षातून जात असल्याचे दिसत आहे. पण कडक उन्हामुळे रिक्षाचालक अस्वस्थ होत असल्याचे तिला दिसले, मग ती छत्री रिक्षा चालकाच्या डोक्यावर वळवते जेणेकरून वृद्ध रिक्षाचालकाला सावली मिळेल.
हा माणुसकी पसविणारा फोटो सध्या वेगवेगळ्या कॅप्शनसह इंटरनेटवर शेअर केला जात आहे. आता वापरकर्ते त्या महिलेचे कौतुक करत आहेत कारण तिने तिच्या छत्रीच्या मदतीने भर दुपारी अज्ञात रिक्षाचालकाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
वृत्तमाध्यमांना तपासात असे आढळून आले आहे की, हा व्हायरल फोटो उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील कलाम चौकातून क्लिक करण्यात आला आहे. शनिवारी ४० अंश सेल्सिअस तापमानामुळे जिल्ह्यातील लोकांना त्रास होत असल्याचा दावा एका ट्विटर युजरने केला आहे. दरम्यान, शाळेतील शिक्षिका हुमा दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी जात असतांना कलाम चौकात रिक्षावाल्याला उन्हामुळे विचलित होताना दिसल्यावर तिने छत्री डोक्यावर ठेवली.
आयएएस नेहा शर्माच्या अनऑफिशियल अकाउंटवरून हा फोटो शेअर करताना लिहिले आहे,’आज कॉलेजांमध्ये लाखो डिग्री आहेत, मात्र असे चित्रच माणुसकीचा धडा शिकवते.’ दुसरीकडे, इतर सोशल मीडिया वापरकर्ते रिक्षाचालक आणि महिलेचा फोटो शेअर करत आहेत ‘मानवतेपेक्षा मोठा कोणताही धर्म नसतो’, ‘इन्सानियत जिंदा रहे; असे कॅप्शन देत कौतुक करत आहेत.