मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरचे ब्लू टीक हा आजच्या दिवसभरातील सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. अमिताभ बच्चनपासून ते अनेक सेलिब्रिटींचे ट्वीटरवरील ब्लू टीक काढण्यात आले आहे.
दरम्यान, सेलिब्रेटींप्रमाणे राजकारणातल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्याही अकाउंटचे ब्लू टीक काढण्यातया आले आहे. या राजकारण्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यांच्याही अकाऊंटचा समावेश असून त्यांच्या अकाउंटचे आता ब्लू टीक हटवण्यात आले आहे.
कालपासून ट्वीटरने मोफत ब्लू टीक हटवण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ब्लू टीक हटवण्यात आली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांची ब्लू टीक कायम आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची ब्लू टीक मात्र कायम आहे.
एलॉन मस्कने ट्वीटरचा ताबा घेतल्यापासून ट्वीटरमध्ये अनेक बदल झाले. त्यापैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे ट्वीटरची ब्लू टीक. ट्वीटरने सर्व खात्यांच्या मोफत ब्लू टीक हटवल्या आहेत. त्यामुळे आता ज्यांना ब्लू टीक हवी आहे, त्यांनी ट्वीटरने सांगितलेले शुल्क भरणं बंधनकारक आहे. त्यामुळे कालपासूनच अनेक नेते, अभिनेते, सेलिब्रिटीज यांच्या अकाऊंट्सचे ब्लू टीक हटवण्यात आले आहेत.