छत्रपती संभाजीनगर – शहरात अवैध धंदे सुरु ठेवण्यासाठी पोलिस मोठ्या प्रमाणात हप्ता(पैसे) घेतात, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका खासगी वृत्तवाहिनिला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यानंतर आता दानवे यांनी थेट पैसे वसुली करणाऱ्या एजंटांच्या नावासह किती रक्कम घेतली जाते याची यादीच जाहीर केली आहे.
ही यादी सध्या प्रसार माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दानवे यांच्या या आरोपांवर गृहमंत्री काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे आहे.
अंबादास दानवे यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार, गुटखा हा अवैध व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी पोलिस महिन्याला 9 लाख 40 हजार रुपये हप्ता वसूली करतात. गावठी दारूसाठी 5 लाख 20 हजार, मटका सुरु ठेवण्यासाठी 12 लाख रूपये, लॉजिंग, वाईन शॉप, जुगारासाठी 6 लाख 60 हजार रुपये, वाळू, गॅस रिफिलिंगसाठी 18 लाख रुपये, मुरूम तस्करी 4 लाख यासह खासगी वयक्तीक वसुलीही केली जाते असा आरोप करून दानवे यांनी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये वसूली करणाऱ्याचे नावही देण्यात आले आहे.