नवी दिल्ली – ओपन एआय ही कंपनी तिच्या लोकप्रिय चॅटजीपीटी या चॅटबॉटसाठी ओळखली जाते. या चॅटजीपीटीला मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचा देखील सपोर्ट आहे. नोव्हेंबरमध्ये या कंपनीची स्थापना झाली आणि तेव्हापासून चॅटबॉटने संपूर्ण जगभरातुन प्रसिध्दी मिळवली आहे.
युजर्सने कोणत्याही प्रकारचा प्रश्न किंवा माहिती चॅटजीपीटीवर विचारली तर त्याला अतिशय जलद उत्तर मिळतं. त्यामुळेच चॅटजीपीटीला सर्वाधिक पसंती मिळत असून हळूहळू चॅटजीपीटीने जगाला व्यापून टाकले आहे. आता याच चॅटजीपीटीने आर्टिफिशियल इंटिलिजन्स सिस्टीममधील त्रुटी शोधून दाखवणाऱ्या युजर्सना 20,000 डॉलरपर्यंत म्हणजेच भारतीय चलनाप्रमाणे तब्बल 16.4 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे.
यासाठी कंपनीने ‘द ओपन एआय बग बाऊंटी’ नावाचा सुद्धा प्रोग्रॅम सुरू केला असून युजर्सने सिस्टीममधील दाखवून दिलेली चूक किती गंभीर आहे. हे तपासून त्याला बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा चॅटजीपीटीमधील त्रुटी शोधून लाखो रुपयांचे बक्षीस मिळवू शकता. दरम्यान, चॅटजीपीटीचा वापर हा दिवसेंदिवस वाढतच चालला असून टेक कंपन्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसत आहे.