मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे अनेकदा एकमेकांना डेट केल्यामुळे चर्चेत असतात. अनेकवेळा दोघेही एकत्र स्पॉट झाले आहेत. त्याचवेळी अनन्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती आदित्यचे नाव ऐकताच हसायला लागते.
अलीकडेच अनन्याने बॉलिवूड हंगामा स्टाईल आयकॉन अवॉर्ड्स 2023 मध्ये हजेरी लावली. यावेळी ती काळ्या रंगाचा थाई स्लिट ड्रेसमध्ये दिसली आणि तिने रेड कार्पेटवर सर्वांची मने जिंकली. तसेच पापाराझींसमोर तिने जोरदार पोज दिली.
हा व्हिडीओ व्हायरल भयानी यांनी शेअर केला आहे, ज्यामध्ये तिला एक पापाराझी म्हणतो, ‘तुझा रॅम्प वॉक चांगला होता..तुम्ही दोघे एकत्र छान दिसता.” हे ऐकून अनन्या लाजायला लागली. तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य दिसले.
अनन्या पांडे आणि आदित्यच्या अफेअरची चर्चा गेल्या वर्षी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमधून सुरू झाली होती, जिथे करणने दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर दोघेही अनेकदा चर्चेत असतात. हि जोडी एकत्र स्पॉट्स होते. त्याचबरोबर अनेक पार्ट्यांमध्ये दोघेही एकत्र दिसले आहेत. नुकतेच लॅक्मे फॅशन वीकमध्ये दोघेही एकत्र दिसले होते. जरी दोघांनी कधीही त्यांच्या नात्याचा खुलासा केलेला नाही.
दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आदित्य लवकरच गुमराह या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर अनन्या आयुष्मान खुरानासोबत ड्रीम गर्ल 2 या चित्रपटात दिसणार आहे.