इस्लामाबाद – पाकिस्तानची गुप्तहेर संघटना “इंटर सर्व्हिसेस इंटिलिजन्स’चे ब्रिगेडियर दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीमध्ये ठार झाल्याचे “आयएसआय’च्या जनसंपर्क विभागाने म्हटले आहे.
मुस्तफा कमाल बारकी असे या ब्रिगेडियरचे नाव असून साऊथ वझिरीस्तानच्या अंगूर अड्डा भागामध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत ते ठार झाले. या चकमकीच्यावेळी दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार झाला. यावेळी ब्रिगेडीयर मुस्तफा कमाल बारकी हे चकमकीचे नेतृत्व केले होते. या चकमकीमध्ये ते ठार झाले आणि अन्य 7 जण जखमी झाले.
“पाकिस्तानच्या नकाशामध्ये…” शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीतून पाकची माघार
उत्तर आणि दक्षिण वझिरीस्तान जिल्ह्यांच्या सीमेवर संशयित दहशतवाद्यां विरुद्धच्या कारवाईदरम्यान दोन मुलांचा मृत्यू झाला होता. यावेळी झालेल्या कारवाईदरम्यान आठ संशयित दहशतवादी आणि दोन सैनिक जखमी झाले होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये अन्यत्र आणखी दोघेजण ठार झाल्याचेही वृत्त आहे.