मुंबई – मला धर्मांध हिंदू नको, मला धर्माभिमानी हिंदू हवा आहे. मला मुसलमान पण माझ्या सोबत हवा आहे पण तो मुसलमान जावेद अख्तर यांच्या सारखा मुसलमान हवा असं राज ठाकरे गुढी पाडवा मेळाव्यात म्हणाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. आज दुपारपासूनच शिवाजी पार्क मैदानावर मनसैनिकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती.
आपल्या हिंदुत्वाची व्याख्या सांगताना राज ठाकरेंनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला. मला मुसलमान बांधव देखील हवे आहेत असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. जावेद अख्तर यांच्या सारखा मुसलमान हवा…असा मुसलमान पाकिस्तानात जाऊन त्यांना २६/११ च्या हल्ल्यांबद्दल कडक शब्दांत सुनावून येतो.तसेच यावेळी राज ठाकरेंनी जावेद अख्तर पाकिस्तानात जे बोलले त्याची व्हिडीओ क्लिप देखील दाखवली.
गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मनसेच्या या सभेमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्यच लक्ष लागले होते.यावेळी बोलताना राज ठाकरेंनी नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडतानाचा किस्सा देखील सांगितला. राणे बाहेरच पडले नसते असा खुलासा राज ठाकरेंनी यावेळी केला.
सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन राज ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. धनुष्यबाण तुझा कि माझा हे होत असताना वेदना होत होत्या. राजकारण लहानपानपासून पाहत आलो अनुभवत आलो. असंख्य लोकांच्या घामातून उभी राहिलेली ती संघटना मी पाहिली. मी बाहेर पडतानाही म्हंटल होत ही चार टाळकी पक्ष खड्ड्यात घालणार आणि त्यात वाटेकरी होण्याची माझी इच्छा नाही म्हणून बाहेर पडलो असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.