नवी दिल्ली – शांघाय सहकार्य संघटनेच्या अंतर्गत नवी दिल्लीमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या “मिलिटरी मेडिसीन स्पेशालिस्ट कॉन्फरन्स’ च्या बैठकीमधून पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी माघार घेतली. पाकिस्तानच्या नकाशामध्ये जम्मू काश्मीरचा सीमाभाग चुकीच्या पद्धतीने दर्शवण्यात आला होता. यावर भारताच्यावतीने आक्षेप घेतला गेल्यानंतर पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी या बैठकीला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी जम्मू काश्मीरला पाकिस्तानचा भाग म्हणून या नकाशामध्ये दर्शवले होते. याकडे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने लक्ष वेधल्यावर त्यावर आक्षेप घेण्यात आला.
शांघाय सहकार्य संघटनेची परिषद जुलैमध्ये नवी दिल्लीत होणार आहे. त्या निमित्ताने भारतात अधिकारी आणि मंत्रिपातळीवरील विविध बैठका होत आहेत. या बैठकांच्यावेळी हा प्रकार वारंवार घडला आहे. साथीचे रोग, आरोग्य सुविधा आणि औषधोपचारातील सैन्यदलाचे योगदान या विषयावरील बैठकीमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधी सहभागी होणार होते. मात्र बारताच्या अधिकाऱ्यांनी गेतलेल्या आक्षेपामुळे पाकिस्तानी प्रतिनिधी या बैठकीला अनुपस्थित राहिले.
US : भेटवस्तूंची माहिती ट्रम्प यांनी दडवली; अमेरिकेच्या संसदेच्या कमिटीने केला आरोप
दरम्यान, पाकिस्तानच्या प्रतिनिधींच्या अनुपस्थितीमुळे “एससीओ’अंतर्गत होणाऱ्या अन्य बैठकांच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही.