मुंबई – दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदनना केवळ दक्षिण भारतातच नाही तर देशभरात लोकप्रिय आहे. तिची हटके स्टाईल प्रत्येक चाहत्यांची मने जिंकतात. रश्मिका आता एका मराठी अवॉर्ड फंक्शनसाठी देखील हजर होती. याचा एक प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल होतोय. ज्यामध्ये रश्मीका थेट मराठीत बोलताना दिसते. विशेष म्हणजे प्रोमोमध्ये रश्मीका आणि मराठमोळ्या निलेश साबळेंची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने देशभर चांगलाच धुमाकूळ घातला. गरीब पण ऍटिट्यूड असलेला पुष्पा सर्वांनाच खूप आवडला. रश्मीका मंदनाने देखील या चित्रपटात अल्लूसोबत दमदार भूमिका साकारली होती. त्यामुळे रश्मीका खऱ्या अर्थाने साऊथ इंडस्ट्रीसह देशभरातील घरामणध्ये पोहचली. आता रश्मीका एका मराठी अवॉर्ड सोहळ्यमध्ये हजेरी लावल्यामुळे चर्चेत आली आहे.
यावेळी साऊथ अभिनेत्रीने थेट मराठी अभिनेता निलेश साबळेंसोबत मराठी संवाद साधल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आगामी काही दिवसांमध्ये हा पुरस्करसोहळा टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे. कोल्हापूरला यायला आवडलं का ? तांबड्या पांढऱ्या रश्श्याबाबत काय सांगाल ? इथं येऊन तुम्हाला कसं वाटलं ? असे अनेक मराठीतले प्रश्न यावेळी साबळेंनी रश्मीकाला विचारले आणि तिने देखील मराठीतच याची उत्तरे दिली.
रश्मीकाने आपल्या हटके स्टाईलने यावेळी चक्क लावणीवर देखील डान्स केला. माझ्या लहानपणी एका दाजीबावर डान्स केल्यानंतर आता पुन्हा दुसऱ्यांदा या सोहळ्यासाठी लावणीवर डान्स करण्याची संधी मिळाली असल्याचे रश्मीकाने यावेळी सांगितले.