सिमला – हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शुक्रवारी विधानसभेत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी राज्यातील महिलांना दरमहा 1500 रूपयांची मदत देण्याच्या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी तरतूद केली आहे. राज्यातील डिझेलवर चालणाऱ्या 1500 बसेस काढून टाकून त्याजागी इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या बसेस घेण्यात येणार आहेत. त्यासाठी या अर्थसंकल्पात एक हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी कांगडा जिल्ह्याचा पर्यटन राजधानी म्हणून विकास केला जाईल आणि येत्या एक वर्षात सर्व 12 जिल्हे हेलिपोर्ट सुविधेने जोडले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले, “आम्ही लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी आलो आहोत आणि जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करून राज्यातील सुमारे 1.36 कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ दिला आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांचे सरकार निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेली सर्व आश्वासने टप्प्याटप्प्याने पूर्ण करेल. पहिल्या टप्प्यात, 2,31,000 महिलांना निवडणूक आश्वासनानुसार प्रति महिना 1,500 रुपये मदत देण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी उपाययोजनांची घोषणाही केली.