नेवासा – नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथील श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर येथे महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाला त्रिवेणीश्वर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.भावी पिढीच्या भवितव्यासाठी मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आईवडिलांची असून भरकटत चाललेल्या युवा पिढीमध्ये परिवर्तन होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख -इंदोरीकर यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या कीर्तन सोहळयाच्या प्रसंगी हभप इंदोरीकर यांनी त्रिवेणीश्वर महादेवाचे व ब्रम्हलिन महंत प्रल्हादगिरी महाराज यांच्या समाधीचे दर्शन यावेळी झालेल्या कीर्तन प्रसंगी श्री त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरी जी महाराज यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले. यावेळी त्रिवेणीश्वर देवस्थानच्या भव्य सभामंडपामध्ये झालेल्या कीर्तन प्रसंगी बोलतांना हभप इंदोरीकर महाराज म्हणाले की सद्याच्या परिस्थितीवर प्रहार केला मुलींकडे लक्ष द्या त्यांचे मोबाईल तपासा त्यांच्यावर चांगले संस्कार करा,मुलांकडे नजर ठेवा ते अभ्यासाकडे किती लक्ष देतात याची नोंद घ्या ते काय करतात याची ही जबाबदारी घ्या असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.घराचा आहार घेत चला भाजीपाल्याचा वापर करा आपल्याला कोणतेही रोग होणार नाही असा सल्ला देखील त्यांनी यावेळी बोलतांना दिला.
उपस्थित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत त्यांनी सद्याच्या परिस्थितीत मुले किती मोबाईल गेमच्या मागे लागले हे सप्रमाण सिध्द केले,मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आईवडिलांनी शुद्ध शाकाहार त्यांना द्यावा असा सल्ला दिला,सद्या युवा पिढी भरकटत चालली याबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी मुले काय करतात,त्यांची संगत कोणाबरोबर आहे यांची माहिती घ्या त्यांच्याकडे द्या,सद्याच्या परिस्थितीत गाडीवर असतांना मोबाईलवर बोलणे व दारू पिऊन गाडी चालवणे या प्रकारामुळे
अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण सर्व प्रश्नांवर मोर्चे काढतो रस्त्यावर येतो मात्र ज्या दारूमुळे वाटोळे केले ती बंद व्हावे म्हणून कोणी रस्त्यावर उतरले का मोर्चे काढले का असा वस्तुस्थितीजन्य सवाल त्यांनी यावेळी बोलतांना विषद केला.कमी वयातील मुले व्यसनामुळे मरतात हे सांगतांना ते भावुक झाले यावेळी उपस्थित जनसागर ही स्तब्ध झाला.मुलांना जीवनात चांगले संस्कार द्या त्यांना आध्यात्मिक ज्ञान दया असे आवाहन त्यांनी केले,लग्नातील व्याही भेट,लग्नाच्या अगोदर फोटो काढणे पोझ देणे,बलून डान्स, असे प्रकार संस्कृतीचा मोठा
अपमान करणारे असल्याने ते टाळा,रामकृष्ण हरि म्हणा,भावी पिढीच्या हितासाठी व समाजात परिवर्तन होण्यासाठी पुढे या असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या कीर्तन प्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता उपस्थित भाविकांना नेवासा पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर जोजार यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.त्रिवेणीश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज यांनी आभार मानले.