मुंबई – अभिनेता अक्षय कुमार प्रत्येक वर्षी किमान चार तरी चित्रपट करतोच. ओटीटी असो वा थिएटर अक्षयचा बोलबाला सगळीकडे पाहायला मिळतो. सध्या अक्षय कुमारने शेअर केलेला एक व्हिडीओ चांगलाच व्हयरल होतोय. या व्हिडिओमध्ये अक्षयने साऊथ अभिनेत्यासह भन्नाट डान्स केला आहे.
अक्षय कुमारने शेअर केलेला व्हिडीओ एका समारंभातील असल्याचे समजते. यावेळी अक्षयसोबत डान्स करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून साऊथ स्टार मोहनलाल आहे. व्हिडिओमध्ये दोघेही भांगडा डान्स करताना दिसताहेत. दोन्हही स्टार्सला नाचताना पाहून फॅन्स चांगलेच खुश झालेत. फॅन्सने या व्हिडिओवर कमेंटचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.
View this post on Instagram
“मोहनलाल सर, तुमच्याबरोबर केलेला हा भांगडा डान्स कायमच लक्षात राहील. माझ्यासाठी हे अविस्मरणीय क्षण आहेत” असं कॅप्शन अक्षय कुमारने दिले आहे. मोहनलाल यांनी तामिळ,तेलगू, कन्नड अशा विविध भाषांमध्ये काम केलेले आहे. अक्षयने त्यांच्यासोबत भांगडा केल्याने साऊथ इंडस्ट्रीतील मोहनलाल यांचे फॅन्स देखील खिलाडी कुमारवर खुश होत कमेंट करत आहेत.