नवी दिल्ली : दिल्लीतल्या तिहार तुरूंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्यावर आरोप केले आहेत. या सुकेशने दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांना एक पत्र लिहिली आहे. याच पत्रात त्याने ही बाब नोंदवली आहे. अरविंद केजरीवाल आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन या दोघांकडून माझा मानसिक छळ सुरू आहे तसेच मला धमक्या दिल्या जात आहेत. आमच्या विरोधातल्या तक्रारी मागे घे हे सांगत मला त्रास दिला जातो आहे असेही सुकेशने पत्रात लिहिले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन हे तुरुंग प्रशासनाच्या आणि इथल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मला धमक्या देत आहेत तसेच मला मानसिक त्रास देत आहेत. मला किती त्रास दिला जाईल आणि मी काय अस्वस्थ कसा राहिन हे पाहात आहेत. एक महिन्यापूर्वी जेव्हा मी मंडौली जेल १४ या ठिकाणी होतो तेव्हा सत्येंद्र जैन यांनी तुरुंगाचे अधीक्षक राजेंद्र आणि उपअधीक्षक जय सिंह या दोघांनाही मला धमक्या देण्यास सांगितले. मी कुणाच्याच धमक्यांपुढे नमणार नाही असेही सुकेशने आपल्या पत्रात नमूद केले आहे.
सुकेशने हा आरोप केला आहे की सत्येंद्र जैन यांनी त्याला ३१ डिसेंबरच्या दिवशीही धमकी दिली होती. सत्येंद्र जैन यांच्या विरोधात जे पुरावे आहेत ते कुठे आहेत ते सांग ही तुला लास्ट वॉर्निंग आहे असे मला धमकवण्यात आले होते असेही सुकेशने पत्रात म्हटले आहे. माझ्याकडे जे पुरावे आहेत ते चॅट, स्क्रिन शॉट आणि व्हॉईस रेकॉर्डिंगच्या स्वरूपातले आहेत हे पुरावे माझ्याकडे परत मागण्यात आले होते. त्यासाठी मला धमक्या दिल्या जात आहेत असेही सुकेशने म्हटले आहे.
डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनसोबत संपर्क करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र जॅकलीनने त्याला भाव दिला नाही. त्यानंतर सुकेश चंद्रशेखरने डोकं लावलं. त्याने गृहमंत्री अमित शाह यांच्या ऑफिसमधला नंबर घेऊन त्याने जॅकलिनच्या एका निकटवर्तीयाशी संपर्क साधला. त्या मार्गे त्याने जॅकलिनच्या संपर्कात येण्याचा पर्याय निवडला.
जॅकलिनसचा मेकअप आर्टिस्ट शान मुत्ताथिलला त्याने संपर्क साधला होता. जॅकलिनचं इंस्टाग्राम पेज पाहिलं तर शान आणि तिची चांगली दोस्ती आहे हे लक्षात येतं. शानने एक चांगला मित्र म्हणून जॅकलिनला सांगितलं की त्याला एका व्हिआयपी नंबरवरून फोन आला होता. त्या नंबरवरून ज्याने फोन केला होता त्या कॉलरला तुझ्याशी बोलायचं आहे. हा कॉल व्हीआयपी नंबरवरून आला होता. या फोनवरवरून बोलणाऱ्याने त्याचं नाव शेखर रत्न वेला असे सांगितले होते आणि सरकारी कार्यालयातून बोलत आहोत असेही सांगितले होते. हा शेखर रत्न वेला म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून सुकेश चंद्रशेखरच होता.