सातारा – जिल्ह्यातील विविध तालुक्यांत विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून खासदार उदयनराजे भोसले यांनी सुचवलेल्या कामांपैकी सात कोटी 51 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सातारा तालुक्यातील खोडद येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, वनगळ येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, चाळकेवाडी, चिंचणेर वंदन येथील फडतरे वस्ती, मांडवे, मस्करवाडी, सोनापूर अकले, संभाजीनगर येथील अंतर्गत रस्ते, जिहे येथील मुख्य रस्त्यापासून श्री भैरवनाथ मंदिरापर्यंत कॉंक्रिटीकरण, चिखली येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, नागठाणे येथील हिराई गोल्डन सिटीमध्ये अंतर्गत खडीकरण व डांबरीकरण करणे.
रायघर येथे स्मशानभूमी शेड बांधणे, कामेरी येथे स्मशानभूमी संरक्षक भिंत बांधणे, साबळेवाडी येथील अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, पाटखळ स्वामीनगर येथील रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे, जावळी तालुक्यातील वरोशी गावठाण अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, मामुर्डी अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे आवळण येथील अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, गुरेघर वेताळ मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, खांबील चोरगे येथे स्मशानभूमी शेड व बैठक व्यवस्था करणे, लाखवड येथील गणेशवाडी अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, गुगुले स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,
खंडाळा तोंडल अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, भादे ताटे वस्ती येथे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, भोगवे येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, लाखवड येथील अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे. वाई तालुक्यातील बावधन येथील अंतर्गत रस्ते खडीकरण, कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथील आरसीसी गटार बांधकाम, बर्गेवाडी येथील गणेश तळे ते सातारा रोड खेड रस्त्याकडे खडीकरण करणे, पाटण तालुक्यातील नावडी अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, सैदापूर येथे प्रकाशनंद कॉलनीमधील रस्ता कॉन्क्रीट आणि डांबरीकरण, मसूर खडकपेट येथील मोहल्ला ते संजय शिंतोडे यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे,इत्यादी कामांचा यामध्ये समावेश आहे.
कोल्हापूर पद्धतीचे साठवण बंधारे या शीर्षकाखाली खंडाळा तालुक्यातील पाडळी बोरकर वस्ती पाझर तलाव दुरुस्ती करणे, सातारा तालुक्यातील साबळेवाडी येथे साठवण बंधारा बांधणे ,बोरखळ ते साठवण बंधारा बांधणे, जांभी सवलगीचा ओढा येथे साठवून बंधारा तयार करणे, काळोशी येथे साठवण बंधाऱ्याची बांधणी, कराड तालुक्यातील गायकवाडवाडी येथे साठवण बंधारा, खंडाळा तालुक्यातील पारगाव जवळेकर नवरी रस्ता डांबरीकरण करणे अशा विविध कामांचा यामध्ये समावेश असून त्यासाठी एकूण सात कोटी 51 लाख निधी जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे . सदरची कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवली जाणार आहे.