नवी दिल्ली – भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “आता हे तर 2024 मध्येच कळेल , पण जर विचारले तर आमचे राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत अशी आमची इच्छा आहे.’
“ये तो 2024 तय करेगा, लेकिन हमारे मन में ये है कि राहुल गांधी PM बने”
◆ कांग्रेस नेता @Pawankhera pic.twitter.com/X4LKYuAIOb
— News24 (@news24tvchannel) December 24, 2022
दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाता सुरू असलेली ‘भारत जोडो यात्रा’ देशाची राजधानी दिल्लीत मोठ्या दिमाखात दाखल झाली आहे. या यात्रेने आज सकाळी बदरपूर सीमेवरून दिल्लीत प्रवेश केला आहे. यावेळी या यात्रेत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनीदेखील सहभाग घेतला असल्याचे पाहायला मिळाले.