नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन हे सध्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात तुरुंगात कैद आहेत. मात्र तरीही ते चांगलेच चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. तुरुंगातील मालिश आणि जेवणाचा आस्वाद घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तुरुंगातील सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये जैन पाहुण्यांचे स्वागत करताना दिसत आहेत. तिहारचे निलंबित तुरुंग अधीक्षकदेखील या व्हिडीओत जैन यांची भेट घेताना दिसत आहेत. या नव्या व्हिडीओमुळे जैन यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
नव्याने समोर आलेला १० मिनिटांचा हा व्हिडीओ १२ सप्टेंबरचा आहे. पलंगावर आराम करत असताना तीन लोकांशी संवाद साधताना जैन या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. काही मिनिटांनंतर निलंबित तुरुंग अधीक्षक अजित कुमार खोलीत दाखल होताच अन्य लोक बाहेर जाताना या व्हि़डीओत दिसत आहेत.
#WATCH | More CCTV visuals of jailed Delhi Minister and AAP leader Satyendar Jain in Tihar jail come out: Sources pic.twitter.com/4c6YdJ2bAL
— ANI (@ANI) November 26, 2022
काही दिवसांपूर्वी सत्येंद्र जैन यांचा तिहार जेलमध्ये मालीश घेतानाचा व्हिडीओ जारी केल्यानंतर भाजपाने आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ शेअर केला होता. जैन कारागृहात जेवणाचा आस्वाद घेतानाचा व्हिडीओ भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी ट्वीट केला होता.
त्यांच्या यापूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये सत्येंद्र जैन जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. एखाद्या रिसॉर्ट किंवा सुट्टीवर असल्याप्रमाणे त्यांना जेवण पुरवलं जात आहे. केजरीवाल यांनी या हवालाबाजला शिक्षा नव्हे तर व्हीव्हीआयपी मजा मिळेल याची खात्री केली आहे,” असे ट्वीट शेहजाद पूनावाला यांनी केले होते.