मुंबई – अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक आहे. या दोघांच्या जोडीवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. ही जोडी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. विराट आणि अनुष्का शर्मा केवळ वैयक्तिक आयुष्याबाबतच नाही तर व्यावसायिक आयुष्याबद्दलही चर्चेत येतात. आता नुकतीच या दोघांबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. काही वेळापूर्वी, प्रसिद्ध गायक किशोर कुमारचा जुहूचा बंगला विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी भाडेतत्त्वावर घेतला होता आणि आता नुकत्याच आलेल्या बातम्यांनुसार, दोघांनी मुंबईत एक छोटा फ्लॅट भाड्याने घेतला आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी नुकताच मुंबईतील पोर्श एरिया जुहूमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे. हाय टाइड इमारतीच्या चौथ्या मजल्यावर त्यांचे अपार्टमेंट आहे. रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने भाड्याने घेतलेला हा फ्लॅट फक्त 1650 स्क्वेअर फूट आहे, जिथून संपूर्ण सी व्ह्यू (समुद्र) दिसतो. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या या नवीन फ्लॅटचे भाडे 2.76 लाख आहे. आणि या फ्लॅटसाठी या जोडप्याने सुमारे 7.5 लाख रुपये डिपॉझिट दिले आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या जुहू येथील भाड्याच्या घराचे मालक दुसरे कोणी नसून माजी क्रिकेटपटू समरजित सिंग गायकवाड आहेत.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी यापूर्वी 12 ऑक्टोबर 2022 रोजी गायक किशोर कुमारचा बंगला भाडेतत्त्वावर घेतला होता, जिथे या जोडप्याने त्यांचे स्वतःचे रेस्टॉरंट उघडले आहे, ज्याचे नाव त्यांनी One8 कम्यून ठेवले आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माने जुहूमध्ये भाड्याने फ्लॅट का घेतला आहे, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा वरळीच्या ओंकार बिल्डिंगमध्ये स्वतःचा फ्लॅट आहे. या दाम्पत्याचा या इमारतीत ३५व्या मजल्यावर फ्लॅट आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या या फ्लॅटची किंमत जवळपास 34 कोटी आहे. याशिवाय अनुष्का शर्माचा वर्सोव्यात मोठा फ्लॅट आहे.