नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे मंत्री सत्येंद्र जैन हे सध्या चांगलेच वादात अडकले आहेत. मनी लॉन्डरिंग प्रकरणात जैन हे सध्या तिहार जेलमध्ये आहेत. दरम्यान, काही दिवसापूर्वी जैन यांच्या तिहार जेलमधील मालीश घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाने आता आणखी एक सीसीटीव्ही फुटेज शेअर केले आहे. कारण जैन यांनी तुरुंगात आपल्याला चांगले जेवण मिळत नसल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर म्हणून भाजपने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.
भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन कारागृहात जेवणाचा आस्वाद घेत असल्याचे दिसत आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी हे सीसीटीव्ही ट्वीट केलं आहे. “मीडियाकडून अजून एक व्हिडीओ! बलात्काऱ्याकडून मालीश घेतल्यानंतर आणि त्याचा फिजिओ थेरपिस्ट असा उल्लेख केल्यानंतर सत्येंद्र जैन जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. एखाद्या रिसॉर्ट किंवा सुट्टीवर असल्याप्रमाणे त्यांना जेवण पुरवलं जात आहे. केजरीवालजी यांनी या हवालाबाजला शिक्षा नव्हेत तर व्हीव्हीआयपी मजा मिळेल याची खात्री केली आहे,” असे ट्वीट शेहजाद पूनावाला यांनी केले आहे.
One more video from media! After taking maalish from rapist & calling him PHYSIO therapist, Satyendra Jain can be seen enjoying sumptuous meal! Attendants serve him food as if he is in a resort on vacation!
Kejriwal ji ensured that Hawalabaaz gets VVIP maza not saza! pic.twitter.com/IaXzgJsJnL
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) November 23, 2022
दरम्यान, व्हिडीओमध्ये सत्येंद्र जैन यांच्यासमोर जेवणाची थाळी दिसत आहे. तसंच त्यांच्या सेवेसाठी एक व्यक्ती सतत हजर असल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. जेवणाची थाळी आणण्यापासून ते खुर्चीच्या शेजारी कचऱ्याचा डबा ठेवण्यापर्यंत सगळी कामं तो करत आहेत. सत्येंद्र जैन यांना तो पाण्याची बाटली देतानाही सीसीटीव्हीत दिसत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे सत्येंद्र जैन यांनी आपल्याला धर्माचं पालन करायचं असल्याने त्याला साजेसं अन्न दिलं जावं अशी मागणी कोर्टात केली आहे. न्यायालयाने याप्रकऱणी तिहार जेल प्रशासनाला आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. आपल्याला जैन पद्धतीचे जेवण आणि मंदिरात जाण्याची परवानही दिली जात नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. मंदिरात गेल्याशिवाय आपण नेहमीचे अन्न खात नाही, तसंच आपण फळं आणि सलाडचा डायट आपण पाळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
भाजपाने शनिवारी सत्येंद्र जैन यांना तिहार जेलमध्ये मालीश दिली जात असल्याचा व्हिडीओ शेअऱ केल्यानंतर वाद पेटला होता. जैन यांनी व्हीआयपी वागणूक दिल्याप्रकरणी तिहार जेलचे अधीक्षक अजित कुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.