T20 World Cup semi final – भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे. हा सामना ऍडिलेडच्या ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सामन्याचे थेट प्रक्षेपण दुपारी १.३० वाजता सुरु होईल. आजच्या सामन्यापूर्वी नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. कारण त्या संघाला मैदानाची परिस्थिती आणि खेळपट्टी पाहता निर्णय घेण्याची संधी मिळते. या मोठ्या सामन्यात भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात तर इंग्लंडचा संघ जोस बटलरच्या नेतृत्वात मैदानात उतरेल.
“विराट मी तुला खूप सपोर्ट केलाय, मात्र तू इंग्लंडविरुद्ध धावा करू नको”
दोन्ही संघामध्ये काही बदल होण्याची दाट शक्यता आहे. कारण इंग्लंडचे धाकड फलंदाज डेव्हिड मलान आणि वेगवान गोलंदाज मार्क वुड यांना दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी फील सॉल्ट आणि ख्रिस जॉर्डन यांचा संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भारतीय संघात ऋषभ पंत खेळणार की दिनेश कार्तिक याबाबत अजूनही सस्पेन्स काय आहे. त्याचबरोबर रविचंद्रन अश्विन किंवा अक्षर पटेलच्या जागी लेगस्पिनर युझवेन्द्र चहलला संधी मिळणार का? याबाबतही अजून कोणतेही स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत.
The second #T20WorldCup semi-final 👊
Who’s coming out on top in Adelaide?
More on #INDvENG ➡️ https://t.co/bBicN5mnDt pic.twitter.com/NtIBjNfVO7
— ICC (@ICC) November 10, 2022
भारत आणि इंग्लंड आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २२ वेळा आमने-सामने आलेले आहेत. यामध्ये भारताने १२ तर इंग्लंडने १० वेळा बाजी मारलीय. त्याचबरोबर दोन्ही देश टी-२० विश्वचषक ( T20 World Cup ) स्पर्धेच्या इतिहासात ३ वेळा भिडले आहेत. यादरम्यान भारताने २ तर इंग्लंडने १ सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघांमध्ये शेवटचा टी-२० विश्वचषक सामना २०१२ मध्ये खेळला होता आणि त्यावेळी भारताने मोठा विजय मिळवला होता.
दोन्ही देशांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार) केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक\ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन\युझवेन्द्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदिप सिंग.
इंग्लड – जोस बटलर (कर्णधार\यष्टीरक्षक), अॅलेक्स हेल्स, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, फील सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, ख्रिस जॉर्डन.