मुंबई – चित्रपटात काम करणारे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री जाहीरांसाठी मॉडेलिंग करताना दिसून येतात. यावेळी अनेकदा या स्टार्सना अतरंगी फोटोशूट करावे लागते. इतरांसाठी हे फोटो अतंरंगी असले तरी अनेकांसाठी ही उत्तम फॅशन असते. साऊथ स्टार विजय देवरकोंडाने देखील असेच एक फोटोशूट केले आहे. ज्यामुळे तो नुसताच चर्चेत आला नाहीए तर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोलही केलं आहे.
विजयने केलेल्या या फोटोशूटमध्ये तो जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. ढिल्ली प्यांट आणि प्लेझर स्टाईल शर्टमध्ये विजयला पाहून चाहत्यांना रणवीर सिंगची आठवण झाली. तो देखील अनेकदा अशाच प्रकारचे फोटोशूट करतो. त्यामुळे चाहत्याने विजयाच्या या फोटोजला रणवीर सिंहचे साईड इफेक्ट असं म्हंटल आहे. तर अनेकांनी हे बाथरूम फोटशूट असल्याचे म्हंटले आहे.
विजयने ‘लायगर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पणकेले होते. मात्र लायगरला हवा तसा प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळाला नव्हता. विजयच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे तर, सध्या तो ‘कुशी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे ज्यामध्ये तो समंथा प्रभूसोबत दिसणार आहे. कुशी चित्रपटाचे दिग्दर्शन शिव निर्वाण यांनी केले आहे.